राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी २ जुलै रोजी शरद पवारांविरोधात बंड केले. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून विरोधी बाकावरून त्यांनी थेट सत्तेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. अखेर, अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. या संपूर्ण कालावधीत अजित पवारांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. या चर्चांना पूर्णविराम द्यावा याकरता अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार यांनी पत्रात लिहिले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या बाबत केलेला हा पत्रप्रपंच”,
“सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करती आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली,” असं अजित पवार म्हणाले आहेत. मात्र या संधीचं सोनं करण्यासाठी आपण फार कष्ट घेतलं असल्याचंही अजित पवारांनी नमूद केलं आहे. “संधी मिळाल्यानंतर त्या संधीची सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. कष्ट व परिश्रम केले. इतर सर्व जाबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.
कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.
काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.
कायमच वडीलधा-यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.
