केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं अनेक औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. ताप, संसर्ग, कोलेस्ट्रॉल, शुगरसह 100 औषधे स्वस्त होणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामुळं औषधांच्या दर कमी होणार आहेत.
यानंतर कोलेस्टेरॉल, साखर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होतील आणि लोकांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल.सरकारी अधिसूचनेनुसार नवीन पॅकिंगवर सुधारित दर असेल. त्याच वेळी, डीलर नेटवर्कला देखील नवीन किंमतींची माहिती द्यावी लागेल. देशात कोरोना महामारीनंतर औषधांच्या किंमती आणि वैद्यकीय खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
देशात आजारांवर उपचार करणे खूप महाग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. कोलेस्टेरॉल, शुगर, अंगदुखी, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होतील. यामुळं लोकांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होणार आहे.
अर्थसंकल्पानंतरच सरकारने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही दिलासादायक बातमी आली आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने साखर, वेदना, ताप, हृदय, सांधेदुखी कमी करणारे तेल आणि संसर्गावरील औषधे स्वस्त केली आहेत. त्यानंतर एजन्सीने 4 विशेष फीचर उत्पादनांनाही मान्यता दिली होती.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ची स्थापना 1997 मध्ये झाली. ही संस्था फार्मा उत्पादनांच्या किंमती ठरवते. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवते आणि औषधांच्या किंमतींवर लक्ष ठेवते.भारत सरकारच्या 29 ऑगस्ट 1997 च्या ठरावानुसार राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ची स्थापना करण्यात आली. औषधोपचार (किंमत नियंत्रण) आदेशाच्या तरतुदींची अंमलबजावणी करणे आणि त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार अंमलबजावणी करण्याचं काम ही संघटना करते. प्राधिकरणाच्या निर्णयांमुळं उद्भवणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी हाताळणे.औषधांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी, कमतरता असल्यास ओळखा आणि उपाययोजना करण्याचं कामही या संघटनेद्वारे केलं जातं.
