बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केलं. मेळाव्याआधी काही शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आले. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. त्याचवेळी फडणवीसांना मंत्री पदावरून त्यांना चिमटा देखील काढला. इमारतीचं काम चांगले केले आहे, पण गृहखातं मिळणार नसल्याची मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली.
अजितदादांनी हेवा वाटावं असं बस स्टँड बनवलं आहे. पोलीस क्वॉर्टर, पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशनही बांधलं आहे. एखाद्या कार्पोरेटचं ऑफिस वाटावं असं पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन झालं आहे. पोलिसांची निवासस्थानेही तशाच पद्धतीने बांधण्यात आली आहे. त्यामुळे माझ्याकडे बारामतीलाच पोस्टिंग करा म्हणून मागणी वाढेल. बारामतीत चांगली निवासस्थाने आणि पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे आम्हाला बारामतीला पाठवा, असा हेका पोलीस लावतील.त्यामुळे मला असं वाटतंय, पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्या चांगल्या इमारती करण्यासाठी तुम्हालाच पीएमसी म्हणून नेमावं असं वाटतं. त्यावर अजितदादा म्हणतील, पीएमसीच का? गृह खातं माझ्याकडे द्या. मी चांगल्या इमारती बांधतो. पण दादा नाही, ते देणार नाही. गृहखातं माझ्याकडेच ठेवेन, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही राजकारणात काम करणारी मंडळी कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर पाच वर्षांनी कंत्राटाचे नूतनीकरण करावे लागते. चांगले काम केले तर जनता आमच्या कंत्राटाचे नूतनीकरण करते आणि चांगले काम केले नसेल तर लोक आम्हाला घरी बसवितात. पण चांगले काम केले तर जन्मभर प्रगती होत असते. आज बारामती येथे होत असलेल्या मेळाव्यात ५५ हजार पदे आहेत आणि फक्त ३६ हजार अर्ज आले आहेत. उद्यापर्यंत आणखी अर्ज येतील, अशी अपेक्षा आहे.
मेळाव्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झालं. या नमो रोजगार मेळाव्यात बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिल्याविषयीही अजित पवार यांचे कौतुक केले. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.
