रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा

हुप्रतिक्षित रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचं आज उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईनपद्धतीने या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा पुणे मेट्रो मार्ग-2 दुपारपासून सुरू होणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीवर मेट्रो पर्याय ठरेल असे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. एस्प्लानेड मेट्रो स्टेशन कोलकाता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे. यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत. – गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत. – 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिटदरात सवलत देण्यात आली आहे. पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना ₹30% सवलत देण्यात आली आहे. तर, शनिवार रविवार सर्वांना ₹30% सवलत मिळणार आहे.

तिकीट दर किती असेल?

वनाज ते रामवाडी- 30 रुपये
रुबी हॉल ते रामवाडी- 20 रुपये

पुणे-पिंपरी चिंचवडमधील अंतर होणर कमी

रामवाडीपर्यंत मेट्रो सुरू केल्याने कल्याणीनगर, नगर रोड आणि येरवडा शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, कर्वे रोड आणि कोथरूड या शहरांमध्ये जाण्यासाठी सहज पोहचता येणार आहे.पुण्याच्या पूर्व भागात प्रवास करण्यासाठी पिंपरी चिंचवड रहिवाशांना अखंड कनेक्टिव्हिटीचा पर्याय मिळाला आहे. प्रवाशांना पीसीएमसी आणि नगर रोडच्या दिशेने प्रवास करण्यासाठी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनवरील दोन लाईनमध्ये स्विच करता येईल.