महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणे सुरू आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. या भरती प्रकियेतून तब्बल 5347 पदे ही भरली जाणार आहेत. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.भरती प्रक्रिया एकूण 5,347 विद्युत सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी राबवण्यात येणार असून यामध्ये प्रवर्गनिहाय रिक्त जागांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
अनुसूचित जाती एकूण रिक्त जागा 673, अनुसूचित जमाती एकूण रिक्त जागा 491, विमुक्त जाती(अ) एकूण रिक्त जागा 150, भटक्या जाती(ब) एकूण रिक्त जागा 145, भटक्या जाती(क) एकूण रिक्त जागा 196, भटक्या जाती(ड) एकूण रिक्त जागा 108, विशेष मागास प्रवर्ग एकूण जागा 108, इतर मागास प्रवर्ग एकूण रिक्त जागा 895, इडब्ल्यूएस एकूण रिक्त जागा 500 व अराखीव एकूण रिक्त जागा 2081
वयोमर्यादा – पात्र उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे.
शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवार 12 वी पास असावा.
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 250 + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. 125 + GST
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. यासाठी https://www.mahadiscom.in/ या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 125 रूपये फीस असेल.
