छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अडचणीत; ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात अशा वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधीत कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 11 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. बघेल यांच्या सोबतच एफआयआरमध्ये महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांच्यासह 17 इतर लोकांची नावे देखील आहेत.

महादेव बुकच्या ऑपरेटर्सच्या माध्यमातून पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारण्यांना हवाल्याद्वारे प्रोटेक्शन मनी पाठवण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून प्रवर्तकांकडून आर्थिक लाभ घेत अवैध संपत्ती मिळवली. ईडीने तात्पुरत्या स्वरूपात अनेक स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

भूपेश बघेल यांच्या विरोधात पोलीसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात अशा वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधीत कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 11 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. बघेल यांच्या सोबतच एफआयआरमध्ये महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांच्यासह 17 इतर लोकांची नावे देखील आहेत.

महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरण हे मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने दावा केला होता की त्यांनी एक कॅश कुरियरचे इमेल स्टेटमेंट ट्रॅक केलं आहे. ज्यामध्ये भूपेश बघेल यांनी यूएई येथील या ॲपच्या प्रमोटर्सकडून कथितरित्या 508 कोटी रुपये घेतले होते. तसेच महादेव बुकचा मालक सध्या अटकेत असून मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

‘महादेव अ‍ॅप’चे दोन मुख्य प्रवर्तक छत्तीसगडचे आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील आर्थिक गुन्ह्यातून अंदाजे सुमारे सहा हजार कोटींचे उत्पन्न लाटण्यात आले. ‘ईडी’ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. राज्य आर्थिक गुन्हे शाखा-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे, 4 मार्च रोजी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस ठाण्यात बघेल आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत

4 मार्च रोजी, या सर्व आरोपींवर EOW मध्ये कलम 120B, 34, 406, 420, 467, 468, 471, सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7, 11 आ्णिया भ्रष्टाचार विरोधी (सुधारणा) कायदा 2018 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.