राज्याच्या काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. विदर्भासह, मराठवाड्यात रविवारी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काल(रविवारी) अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं, फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आजही राज्याच्या काही भागात पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाची आज शक्यता आहे. मंगळवारी मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात नागपूर, गडचिरोली, वर्धा येथे हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला. शनिवारी आणि रविवारी नागपूर आणि परिसरात वेगाने वारे वाहून काही वेळ गारपीट झाली. वाऱ्याच्या वेगामुळे काही झाडे देखील उन्मळून पडली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले.
राज्यातील हवामानात सातत्याने बदलाना दिसत आहे. आता बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमधून थंडी गायब होत असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढू लागला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा 35 ते 37 अंशाच्या दरम्यान आहे. अशात विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 मार्च रोजी राज्यात हवामानाची स्थिती काय राहणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, ते कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाचा पोषक हवामान होत असून, ढगाळ हवामान झाले आहे. शनिवारी (ता. १६) दुपारनंतर नांदेड जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्याने पिकांचे नुकसान झाले.आज (ता. १८) पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
