रामभक्तांसाठी खुशखबर! अयोध्येची वारी लालपरीने करता येणार, एप्रिलमध्ये पहिली गाडी पुण्यातून रवाना होणार

जानेवारी महिन्यात रामलल्लाची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. राम मंदिराचंही लोकार्पण झालं. तेव्हापासुन भाविकांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं झालं आहे. सर्व भाविकांना श्री रामप्रभूंच्या दर्शनाची आस आहे. सरकारने देखील भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता यावं म्हणून विशेष गाड्यांची सोय देखील केली होती.

आताही सर्व रामभक्तांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी बसने थेट अयोध्येला जाणार आहे. एसटी महामंडळातर्फे अयोध्येसाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या मुळे महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिर खूपच सुंदर आहे. देशभरातून भाविक अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विविध राज्यातून अयोध्येकरिता खास रेल्वे ट्रेन देखील सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रात रेल्वे सह अयोध्येकरिता एसटी बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. धुळ्यापाठोपाठ आता पुण्यातून देखील अयोध्येसाठी एसबस सेवा सुरु करण्यात आली आहे.

भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी एसटी हा विशेष उपक्रम राबवत आहे. पुणे जिल्ह्यातून भाविकांच्या मागणीनुसार या एसटी बस सोडल्या जाणार आहेत. जर ४५ ते ५५ जणांचा एक समूह एकत्र प्रवास करणार असेल, तर एसटी सोडली जाणार आहे. खरं या बातमीमुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. २४ एप्रिल रोजी राज्यातून पहिली गाडी अयोध्येला रवाना होणार आहे. भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी पुण्यातून एसटी बस सोडण्यात येत आहेत. ५० जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटीची पाहिजे ती गाडी भक्तांना मिळू शकणार आहे. त्यामुळे भाविकांना आता आपल्या लाडक्या रामप्रभूचं दर्शन घेणं सोपं झालं आहे.

धुळ्यातून अयोध्येसाठी राज्यातील पहिली महामंडळाची बस सुरु झाली. या बसने १६०० किलोमीटरचा प्रवास केला. परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून ४ हजार भाडे आकारलय. या बसमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात आल्यात. तर २ चालक तसेच परिवहनचे २ अधिकारी देखील बसमध्ये होते.