लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज निघणार असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. सन 2019 मध्ये नागपूर लोकसभेसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये 16 उमेदवार निवडणुकीत होते.
पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये पहिल्या आणि एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 7 आणि पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा जागांपैकी तीन जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान आहे. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरची जागा आहे. बंगालच्या कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुड़ी सीट आहे. 2019 मध्ये बीजेपीने बंगालमधील या तिन्ही जागा जिंकल्या होत्या. बंगालमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणे राजकीय समीकरण दिसतायत. भाजपा आणि टीएमसीमध्ये मुख्य सामना आहे. लेफ्ट आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढतायत.
