२० वर्षांपासून फरार असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण

जवळपास २० वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर असलेला पुजारीला चीनमधून भारतात आणले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक त्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन पोहोचले आहेत.मुंबईत पुजारीवर हत्या आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सिटी क्राफ्ट शाखेने त्याची संपूर्ण टोळी उद्ध्वस्त केली. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

गँगस्टर प्रसाद पुजारीला शुक्रवारी रात्री १२ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ येथे आणण्यात आलं. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त गुन्हे दत्ता नलावडे यांनी प्रसाद पुजारीला मुंबई गुन्हे शाखेत नेले. पुजारी याच्यावर मुंबईत अनेक खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. प्रसाद पुजारीवर २०२० मध्ये शेवटचा गुन्हा दाखल झाला होता. शहर गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. मात्र हद्दपारीला उशीर करण्यासाठी प्रसाद पुजारीने एका चिनी महिलेशी लग्न केले होते. पण शहर गुन्हे शाखेचे सततचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आज २० वर्षांनंतर त्याला कायद्याचा सामना करण्यासाठी मुंबईत परत आणण्यात आलं.

मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहणाऱ्या शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यावर १९ डिसेंबर २०१९ रोजी गोळबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात प्रसाद पुजारीचे नाव पुढे आले होते. गोळीबारात जाधव यांना गोळी चाटुन गेली होती. मार्च २००८ मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते. तेव्हा पासुन प्रसाद पुजारी चीन मध्येच स्थायिक होता.

प्रसाद पुजारी याने भारतातून पलायन केले आणि एका चिनी महिलेशी विवाह केला आणि तो तिथेच राहू लागला. मात्र विविध गुन्ह्यांमध्ये असलेल्या पुजारी याला भारतात आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यामुळे तब्बल २० वर्षांनी त्याला भारतात आणण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले.