आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे आणि यासोबतच एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
एकंदर आकडेवारी पाहिली असता मार्च महिन्यामध्ये हे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात गॅसचे दर 14 रुपयांनी वधारले होते. जानेवारी महिन्यात ही वाढ अवघ्या 1.50 रुपये इतकी होती. दरम्यान, व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं वाढ आणि त्यानंतर आता एप्रिल महिन्यात मोठी घट झालेली असतानाच घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती गेल्या महिन्यात कमी-जास्त होत असताना मात्र घरगुती एलपीजी गॅसची किंमत ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला आणि घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली.
यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. यानंतर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली. सध्या या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि एका सिलिंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.
