लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धारही भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. अशात आता अशोक चव्हाण यांच्या भाजपासाठीच्या सभाही चर्चेत आहेत. अशोक चव्हाण भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी नांदेडमध्ये केलेलं भाषण चर्चेत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या नांदेड (Nanded) जिल्ह्यापासूनच प्रचार सभांचं आयोजन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाणांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं. याच सभेत जो बोलता हूं, वो करके दिखाता हूं, असं वक्तव्य करुन अशोक चव्हाणांनी भर सभेत धडाकेबाज डायलॉगबाजी केली. काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत अशोक चव्हाण भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करतात.
भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. आपली शक्ती डबल होणार आहे. डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नही है, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विकासाचे काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो. एकदा मनात आणले की करून दाखवतो, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
प्रतापराव और हम अलग थे. सात, दस साल से वो मुझे और मै उनको पानी मे देखते थे. अब हम दोने एकसाथ आ गये. अशोक चव्हाण की ऐसी आदत नहीं की सामनेंसे एक और पिछे एक. जो मै बोलता हूँ वो मै करके दिखाता हूँ. विकासाचं काम असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न. मी आश्वासन पाळणारा माणूस आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
