संजय राऊत याने भाजप आणि मोदी सरकारचे 12 वाजवले, असा उल्लेख केला आहे. ज्याने स्वतःच्या मालकांचे तीन तेरा वाजवले आहे. त्याने असं बोलणं म्हणजे 2024 मधला मोठा विनोद आहे. ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत… ज्याच कुटुंब व मालक कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात असणारे कधीही जेलमध्ये जाऊ शकतात. महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो, असं म्हणत र नितेश राणे यांनी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पैशाने काही घेतलं नाही. भ्रष्टाचाराने त्यांचं आयुष्य बरबटलेलं आहे, असा हल्लाबोल आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
भाजपा आणि पंतप्रधान मोदींचे भ्रष्टाचाराने बारा वाजवले, असं बेताल वक्तव्य संजय राऊतांनी केलं. देशाच्या पंतप्रधानांविषयी असं वक्तव्य करणार्या संजय राऊतांना नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले. ‘ज्याचं संपूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे त्याने भाजपावर टीका करणं हा मोठा विनोद आहे’, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, ज्याने स्वतःचे, स्वतःच्या मालकाचे आणि मालकाच्या पक्षाचे तीन तेरा वाजवले आहेत त्याने दुसर्यांचे बारा वाजवण्याची भाषा करणं हा 2024 चा मोठा विनोद आहे. आज उद्धव ठाकरेंकडे ना स्वतःचा पक्ष आहे ना स्वतःचं चिन्ह. ओसाड गावचे पाटील म्हणून ते राज्यभर फिरत आहेत, आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा म्हणजे हा भांडुपचा देवानंद, या दोघांनाही अशी भाषा करु नये.
काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्या बाजारू दलालालनी दुसऱ्यांना नाचा बोलू नये. ज्याचा स्वतःचा अस्तित्व नाही त्याने अशी हिंमत करू नये. त्याचं उत्तर 4 जून ला देऊ कोणी कसा वचपा काढला ते समजेल. तुमच्या @#Xमध्ये दम असेल तर दक्षिण मुंबईची जागा लढवून दाखवा, असा इशाराही नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले राणे साहेबांनी सिंधुदुर्ग मध्ये काय दिलं ह्याचा हिशोब हवा असेल तर एका खुल्या व्यासपीठावर या असे आव्हान राणेंनी दिले. विकास कामे अडविण्याचा काम विनायक राऊत यांनी केले आहे. विकासावर चर्चा करू असेही राणेंनी म्हटले. राणे म्हणाले विनायक राऊत यांच्या प्रत्येक खळा बैठकीत 7 पेक्षा जास्त लोक नसतात. चार जूनला राऊत यांना जनता उत्तर देईल असंही यावेळेस नितेश राणे म्हणाले.
