मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी ५० हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील ५ प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पण काही अधिकारी व कर्मचारी हे गैरहजर राहिले असून या गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.
गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. त्यामुळे गैरहजर राहण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
