काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत. ते 100 टक्के भाजपत जातील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. आत्राम यांच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
4 जूननंतर म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर वडेट्टीवर भाजमध्ये प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले, की 4 जूननंतर विरोधी पक्षनेते आमच्यामध्ये येऊन बसतील. ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या आहेत. या बैठकांचा मी साक्षीदार आहे. चर्चा झाली मला माहीत आहे, असं धर्मराव बाबांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
मी आदिवासी माणूस आहे. आदिवासी माणूस खोटा बोलणार नाही, विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाण याचे राईटहॅंड आहेत. आता चव्हाणच भाजपमध्ये आले आहेत. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपात आले आहेत. त्यानंतर लवकरंच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपात येणार आहेत. वडेट्टीवार भाजपात जाणार असल्याची चर्चा झालीय, असा दावाही अत्राम यांनी केलाय. टीव्ही9 मराठी या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना आत्राम यांनी हा दावा केला आहे.
विजय वड्डेटीवार हे अशोक चव्हाणांचे राईट हॅन्ड आहेत,आता चव्हाणच भाजपमध्ये आले आहेत,त्यांनतर नामदेव उसंडी,प्रकाश देवतळ भाजपात आले आहेत. त्यांनतर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार चर्चा सुरु झाली आहे,भाजपात येसाठी वड्डेटीवार यांनी बैठक देखील घेतल्या आहेत त्याचा मी साक्षीदार असल्याचं देखील आत्राम यांनी केला आहे.
आत्राम यांची नार्को टेस्ट करा – विजय वडेट्टीवार
गडचिरोली मतदारसंघ हा काँग्रेसमय झाला असून या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत आहे. भाजपचा पराभव झाला तर धर्मराव बाबा यांचे मंत्रीपद जाईल, म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. गडचिरोलीत मी तळ ठोकून असून म्हणून मला त्रास देण्यासाठी मंत्री आत्राम यांच्याकडून आरोप केले जात आहेत. धर्मराव आत्राम यांना माझे आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून द्यावे. यांच्यापुढे चर्चा झाली तर आत्राम यांची नार्को टेस्ट करा, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
