आनंदाची बातमी, मान्सून अंदमानमध्ये पोहोचला, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

मान्सूनच्या आगमानची चातकासारखी वाट पहात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दोन ते तीन दिवस आगोदर अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाहीतर अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर हा मान्सून पुढे सक्रीय होण्यासाठी पोषक वातावरण अरबी समुद्रात निर्माण झालंय. अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. मान्सून अंदमान, मालदीव, निकोबार आणि अरबी समुद्र मान्सून सक्रीय होण्यासाठीची पुरक परिस्थिती पुढे निर्माण झाली आहे.

मान्सून हा केरळमध्ये साधारण पणे 1 जून ला दाखल होतो. पण यावर्षी मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. असं असलं तरी तिन चार दिवस मागे पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जून दरम्यान मान्सून भारतात असेल. केरळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मान्सून अंदमान निकोबार बेटांवर येतो. दरवर्षाचा विचार करता अंदमान बेटावर तो 21 मे ला दाखल होत असतो. पण यावेळी तो दोन दिवस आधीच येणार आहे. गेल्यावर्षीही मान्सून अंदमानमध्ये 19 मे ला आला होता. पण केरळमध्ये नऊ दिवस उशिराने आला. दरम्यान ला निनामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, जी यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. त्यामुळे वेळेआधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. त्याचवेळी, ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, जे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत.

31 मे रोजी केरळमध्ये धडकल्यानंतर मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सून साधारणपणे जूनच्या मध्यात महाराष्ट्र आणि विदर्भात पोहोचतो. मात्र वावेळी मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या काही दिवस आधी दाखल होऊ शकतो.