महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.
राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024, MH बोर्ड 2024 ची अधिकृत वेबसाइट: https://mahahsscboard.in/. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी थेट लिंक: http://mahresult.nic.in/ किंवा https://mh-ssc.ac.in. कोणत्याही विद्यार्थ्याला वाटले की त्याला किंवा तिला कमी नंबर मिळाले आहेत, तर ते महाराष्ट्र एसएससी बोर्डाद्वारे आयोजित केलेल्या रिपीट परीक्षेत बसू शकतात.
दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
