पोलीस नियंत्रणेला सोमवारी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला. कॉलरने पोलिसांना सांगितले की, मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट केला आहे. पोलिसांनी, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल आणि विमानतळावर झडती घेतली. परंतु तेथे काहीही संशयास्पद आढळले नाही.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन आला. धमकी देणार हा फोन कॉल उत्तर प्रदेशातून आला असल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं आहे. हा कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं. मात्र, तपासादरम्यान त्या ठिकाणी काहीही आढळलं नाही. याप्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई पोलिसांना धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. तत्पूर्वी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातही अशाच प्रचार एका फोनकॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.
याआधी २३ मे रोजी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित लेडी श्रीराम कॉलेज, हंसराज कॉलेज आणि रामजस कॉलेजसह डझनभराहून अधिक महाविद्यालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. परंतु कसून शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना ४.३८ वाजता एलसआर कॉलेजमध्ये बॉम्बच्या धमकीबद्दल प्रथम कॉल आला आणि दोन अग्निशमन दलांना सेवेत आणण्यात आले. त्यानंतर इतर महाविद्यालयांनीही अधिकाऱ्यांना फोन केला.
