मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाच उकाडा दिवसागणिक वाढू लागला आहे. सध्या देशातील राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानानं पन्नाशी ओलांडली असून, या उच्चांकामुळं इतर राज्यांवरही या परिस्थितीचे परिणाम होताना दिसत आहेत. राज्यातही उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, ब्रह्मपूरी इथं सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील सध्याचं हवामान पाहता वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथं उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तापमान कमी असेल. मात्र, सूर्याचा दाह कायम राहील. तिथं हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानाचा आकडा 50 अंशांच्या घरात पोहोचला असून, इथं उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं पुढील 24 तासांमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे.
मध्य प्रदेशात उन्हाळ्याचा कडाका इतका वाढला आहे की, अनेक जिल्ह्यांतील तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. आज मध्यप्रदेशच्या निवारीमध्ये 48.5 अंश, दतियामध्ये 48.4 अंश, रीवामध्ये 48.2 अंश, खजुराहोमध्ये 48 अंश आणि ग्वाल्हेरमध्ये 47.6 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशात सध्या कडक ऊन आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. आज, 28 मे रोजी यूपीच्या झाशीमध्ये 49 अंश, प्रयागराजमध्ये 48.2 अंश, वाराणसीमध्ये 47.6 अंश आणि कानपूरमध्ये 47.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
राज्यातील सध्याचं हवामान पाहता वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथं उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तापमान कमी असेल.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर व वर्धा येथे आज व उद्या चंद्रपूर येथे आज व दिनांक २९ व ३० रोजी तसेच आज अमरावती व उद्या अकोला येथे काही भागात उष्णतेची दाट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धारशिव येथे येथे मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ मे व १ जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
