नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मनस्मृतीमधील काही श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचं बोललं जात आहे. त्यावरुन एसआरईटीकरडून हरकती मागवण्यता येत आहेत. या निर्णयाविरोधात विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात असून आमदार जितेंद्र आव्हाडांनी आज महाडच्या चवदार तळे इथ मनस्मृती जाळून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यामुळे ह्या आंदोलनामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे.
महाडमध्ये ‘मनुस्मृती’चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केलीये. यासंदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आमदार अमोल मिटकरींनी केलीये. यासंदर्भात आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासुन माफी मागितली पाहिजे, असे न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आमदार अमोल मिटकरींनी दिलाय.
संविधानाचा सन्मान करण्यासाठी आम्ही पुढे येतोय, असं शरद पवार साहेबांनी म्हटलं पाहिजे. राजकीय नेते म्हणून ही जबाबदारी आहे. ही घटना दुर्देवी आहे. ही घटना वेदनादायक आहे. संविधानाचा अवमान करणारी आहे. महाराष्ट्राच्या घटनेला कधी माफ करणार नाही. भविष्यात अशी चूक कुणाच्या हातून घडू नये, अशी काळजी सरकारनेही घेतली पाहिजे. कधी काँग्रेस फोडायची, तर कधी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत असं कृत्य करतात. मुळात बाबासाहेबांबाबत अशी कृती मान्यच नाही. या प्रकरणात अॅट्रॉसिटी लागतेच. ही चूक म्हणत कातडी वाचवता येणार नाही. महाराष्ट्र अशा घटनेला कधी माफ करणार नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आनंद परांजपे यांनी निषेध करताना आव्हाड यांचे पोस्टर फाडले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.जितेंद्र आव्हाड हे डाॅक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका असल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
