आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजेत, पाठिंब्याचे विधान दुर्दैवी; हसन मुश्रिफांची छगन भुजबळांवर टीका

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर एकच वादळ उठलं आहे. मनुस्मृती दहन करताना आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे भाजपने आव्हाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करून संताप व्यक्त केला आहे. मात्र असं असतानाच महायुतीतील मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे आव्हाड यांच्या मदतीला धावून आले आहेत. भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केली आहे. भुजबळ यांनी आव्हाड याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली आहे. या निमित्ताने आता मुश्रीफ आणि भुजबळ यांच्यातच जुंपली आहे.

छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळांवर टीका केली. त्यामुळे आता हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडले हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे विधान छगन भुजबळ यांनी केले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवे होते, या शब्दांत हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला आहे.

छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरही मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबतची माझ्याकडे काहीच माहिती नाही. या संदर्भात आमचे नेते अजित पवारच सांगू शकतील, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव परदेशी दौऱ्यावर आहेत. ते लवकरात लवकर येऊन आपल्या सेवेत रुजू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार – छगन भुजबळ
माझं काहीही म्हणणे नाही. पण जे तुम्ही करणारे, बोलणारे आहात. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. मला मान्य आहे ते, असलेच पाहिजे. बाबासाहेबांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे. ती शालेय शिक्षणात येता कामा नये एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार, असे त्यांनी म्हटले आहे.