२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अशा स्थितीत शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जून रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या तयारीसाठी ५ ते ९ जूनपर्यंत राष्ट्रपती भवन पाहुण्यांसाठी बंद राहणार आहे.
इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून एकूण जागांवर आघाडीवर मिळवली, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत.तसंच एनडीए कडे बहुमताचा आकडा आहे.त्यामुळे नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणार. याचे स्पष्ट संकेतही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
देशाच्या नागरिकांनी एनडीएवर सतत तिसऱ्यांदा विश्वास दाखवला.भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक विजयाचा क्षण आहे. मी या स्नेह आणि आशीर्वादासाठी आपल्या कुटुंबासमोर नतमस्तर होतो. मी देशातील नागरिकांना शब्द देतो की त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी नवी ऊर्जा, नवीन संकल्पाना घेऊन पुढे येऊ.”
आजचा हा विजय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. हे भारताच्या संविधानावर निष्ठेचा विजय आहे. हा विकसित भारताचा विजय आहे. सब की साथ सब का विकासाचा विजय आहे. १४० कोटी भारतीय लोकांचा विजय आहे. देशाच्या निवडणूक आयोगाचा मी आभारी आहे. जगातली सर्वात मोठी निवडणूक आयोगाने व्यवस्थिती हाताळली आहे. प्रचंड उन्हामध्ये लोकांनी मतदान केलं. आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिचय दिला. भारताची निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थेवर भारतीयांना गर्व आहे. या सारखं कुठेही उदाहऱण नाही. यावेळी भारतात ज्या लोकांनी मतदान केलं, ते एखाद्या लोकशाही मानणाऱ्या लोकांच्या पेक्षा जास्त आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं असून जगातील लोकांसमोर आदर्श घालून दिला आहे. त्या लोकांनी आदरपूर्वक नमन करतो. सर्व उमेदवारांचं मी अभिनदन करतो. सगळ्यांची सहभागामुळे हा विजय शक्य नव्हता. प्रत्येक कार्यकर्त्याचा मी आभारी आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
आता विरोधकांकदुनही सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे,नितीश कुमार,चंद्रबाबू नायडू या दोघांच्या खासदारांच्या भरवश्यावर विधान असल्याचं दिसत आहे.विरोधकांना हे अनपेक्षित यश मिळाल्याचेही त्यांच्या प्रतिक्रियेनंतर दिसत आहे.मात्र सरकार स्थापनेचा ठोस दावा विरोधक सद्य स्थितीला करू शकत नाहीत हे खरं,त्यामुळे नरेंद्र मोदी आणि एनडीएचं सरकार देशात स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
