विरोधकांचा संविधान बदलण्याचा प्रचार दूर करण्यात आम्ही कमी पडलो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणूक निकालाच चित्र आता स्पष्ट झालय. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 290 पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे. इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे.महाराष्ट्रात निकालाच चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. “सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखापेक्षा जास्तीच मताधिक्क्य मिळालं आहे. त्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच अभिनंदन करतो. ठाणे लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच ठाण्यावर प्रेम होतं. जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकतोय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरनन प्रतिसाद दिला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.

शिवसेनेच्या पारड्यात अवघ्या सहा जागा जाताना दिसत आहे. मात्र असे असले तरी एनडीएचा विजय झाला आहे असे शिंदे म्हणाले. मात्र जे लोक मोदींना आणि भाजपला तडीपार करण्याची भाषा करत होते त्यांनाच सत्तेपासून तडीपार केल्याचा टोला शिंदे यांनी लगावला आहे. विरोधकांनी वोट बँकेचे राजकारण केले त्याचा परिणाम राज्यात दिसून आला. शिवाय संविधान बदलाबाबत संभ्रम निर्माण केला गेला त्याचाही फटका महायुतीला बसल्याचे ते म्हणाले. विरोधकांचा संविधान बदलण्याचा प्रचार दूर करण्यात आम्ही कमी पडलो,मात्र आता जनतेला संभ्रम करणाऱ्यांचा खरा चेहरा दिसेल असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. शिवसेना एनडीएचा घटकपक्ष म्हणून सोबत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. “इंडिया आघाडीला एकाद्वेषाने पछाडलेल होतं. मोदींना तडीपार करायची भाषा करत होते. पण या देशातील जनतेने विकासाला मतदान केलं. तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिला आहे. 15 सीट्स लढल्या परंतु त्यातील काही ठिकाणी जागा जाहीर करण्यात त्याची उशीर झाला. त्यामुळे त्या त्रुटी दूर करू, त्यातून येत्या काळात मार्ग काढला जाईल.