मराठा आंदोलक मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. अशातच मनोज जरांगे यांना दणका बसला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अंतरवली सराटी आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. याची दखल घेत पोलिसांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू असतांना आणखी दोन गावांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांना धक्का बसला आहे.वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी मिळू नये यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे त्रास होत असल्याचं ग्रामस्थानी म्हटलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली आहे. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता अंतरवली पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये म्हणून उपोषणाला विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलं, या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी ते चार जूनपासून उपोषणाला बसणार होते. मात्र अचारसहिंतेमुळे त्यांनी आपलं आंदोलन पुढे ढकललं. आता ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांनी मनोज जरांगे यांना परवानगी नाकारली असली तर जरांगे हे त्यांच्या उपोष्णावर ठाम आहेत. ते चार जूनपासून उपोषणाला बसणार होते. मात्र अचारसहिंतेमुळे ते ८ जून पासून उपोषण करणार होते.
अंतरवली सराटी या गावातील उपसरपंचांसह तब्बल 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत आहे. त्यामुळे प्रशासनने मनोज जरांगे यांना हे उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती.
