नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; 9 जून रोजी नरेंद्र मोदींचा शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची एनडीएमधील घटक पक्षांनी एकमताने नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्याची तयारी राष्ट्रपती भवनात सुरू असून आता नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरली आहे.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली. 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, एनईसी सदस्य आणि बाहेर जाणारे खासदार, सर्व खासदार, आमदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, क्लस्टर प्रभारी, लोकसभा प्रभारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबतच पंतप्रधानांच्या हस्ते मान की बात सहभागी, आदिवासी महिला, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री विजेते देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधीत्व या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

शपथविधी सोहळ्यात अनेक परदेशी नेते विशेष पाहुणे म्हणून येणार आहेत. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राअध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचा समावेश आहे.