पोलिसांची बदनामी, मानसिक त्रास, संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासात पोलीस कर्मचाऱ्याची भावनिक पोस्ट  

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर  आरोप केले जात आहेत. यातीलच एक असलेले  पोलीस हवालदार भागवत शेलार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. इमानदारी केली तिथं कौतुक नाही पण किमान अर्धी माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका अशी विनंती शेलार यांनी केली आहे. ( Defamation of police, mental anguish, emotional post of Police Headconstabale investigating Santosh Deshmukh murder case)

भागवत शेलार यांनी सोशल मीडियावर  पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,
संतोष अण्णा भावपूर्ण श्रद्धांजली…
गेल्या 9/12/24 रोजी पासुन म्हणजे संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या दिवसापासून रात दिवस मनात एकच विचार वरिष्ठांनी सांगितले आहे की काही झाले तरी शेलार आरोपी सापडले पाहिजेत. आपल्या खात्याची होत असलेली बदनामी पिडीताला न्याय द्यायचा या उद्देशाने गेले( 75 ) दिवस मनात एकच विचार आरोपी भेटले पाहिजेत.ऊसात फिरलोत, नाली नदी फिरलोत,काट्या कुपाट्या बघितल्या नाही
रात्री अपरात्री प्रवास करून थकलो तरी थांबलो नाहीत का तर डोळ्यासमोर एकच आपल्यावर वरिष्ठांनी विश्वास दाखवला आहे आरोपी भेटलाच पाहिजे.सर्वच गोष्टी कायदेशीर मार्गाने नाहीत ओ करता येत आणि मदत कोण करत ओ? बोलायला नाव ठेवायला सर्वच येतात.
“परवा वडिलांचं मासिक असताना पण थांबता आले नाही का तर आरोपी शोध कामी मुंबई जाव लागलं मी म्हणू शकलो असतो सर वडिलांचे मासिक आहे पण नाही म्हणू शकलो का तर मला पहिल्या पासुन प्रकरण माहिती आहे आणि सरांना समोर निगेटिव्ह नको बोलायचे म्हणुन गप गेलो.
आरोपी पकडताना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते (आणि ते आरोपीच्या जवळचे असले तर लवकर यश येते उद्देश फक्त आरोपी पकडणे असतो)आम्ही काही पिचर मधले पोलिस नाहीत की आम्हाला तिसरा डोळा आहे आणि लगेच दिसले की पकडले त्यासाठी लोकांवर विश्वास टाकावा लागतो(काही हरामखोर विश्वास घात करतात) त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि काम करतांना चुका ही होऊ शकतात….
याच्या बदल्यात काय मिळाले तर शेलार “वाल्मीक कराड” साठी काम करतो.
गेल्या 75 दिवसात किती मेहनत घेतली,
किती रात्रीच प्रवास केला आणि किती आर्थिक भार पडला हे माझ्या मनाला माहिती O… त्याच यश म्हणून 7 आरोपी मिळाले…

एवढा त्रास घेऊन काय भेटल तर फक्त बदनामी बायको मूल रोज बोलतात पपा तुमच नाव काम करून पण का T.V ला येत काय सांगु त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला प्रामाणिक काम करण्याचा, याचा विचार करावा…
मी काम करतो हे नक्कीच उपकार करत नाही त्याचा सरकार मला मोबदला देते पण जिथे ईमानदारी केली तेथे कौतुक नाही पण किमान ज्यात अर्ध माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका एवढीच विनंती….
शेलार” सुरेश धस साहेब “यांचे साठी काम करतो…
अरे बाबांनो मी पोलिस खात्यासाठी काम करतो अन् पगार tax मधील पैशासाठी घेतो आणि काम करतांना वडिलांना (भाऊ) आठवतो की त्याचं नाव खराब नाही झाल पाहिजे…

आज आमचे पोलिस निरीक्षक,Sdop साहेब,Asp साहेब, आणि S.P नवनीत साहेब हे आधार देतात म्हणून जीवात जीव आहे ओ नसता काम करून बदनामी मिळाली की किती त्रास होतो हे कोण सांगणार अंजलीताई तुम्हांला…..
आज ही S.P साहेब आणि आमचे प्रभारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे फरार आरोपीचा शोध घेत आहोत देव आम्हाला लवकर यश देवो.

संतोष अण्णा कोणी काही म्हणो तुम्हाला न्याय व्यवस्था नक्की न्याय देईल हा विश्वास आहे.

भागवत शेलार,
HC LCB Beed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *