मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराचे सामना अग्रलेखात तोंड भरून कौतुक, भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यासाठी अभिनंदन

 विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या प्रशासनाला शिस्त लावून पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात तोंड भरून कौतुक करण्यात आले आहे. राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे या अग्रलेखात म्हटले आहे. ( Chief Minister Devendra Fadnavis’s transparent governance is praised in the Samna Editorial, congratulations for his fight against corruption)
मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून दलाली, फिक्सिंग करीत होते. हे सर्व ‘फिक्सर’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थ करण्यात आले आहे…
सामनाच्या  अग्रलेखात म्हटले आहे की,
 राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. देवेंद्र  फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवले आहे. ५०० कोटींचे टेंडर तीन हजार कोटींपर्यंत वाढवून मधले हजार कोटी काम सुरू होण्याआधीच ताब्यात घ्यायचे, त्यातले शे-दोनशे कोटी चेल्यांत वाटायचे व त्या सगळ्यांना घेऊन प्रयागतीर्थी गंगास्नान घडवायचे. या सर्व कारनाम्यांना बूच लावण्याचे पवित्र काम श्री. फडणवीस यांनी सुरू केले आहे.
 फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणखी एक महत्त्वाचे काम केले. मंत्र्यांचे ‘पीए’ व ‘ओएसडी’ नेमण्याचे अधिकार काढून घेतले. मंत्र्यांकडून ‘पीए’ व ‘ओएसडी’ म्हणून ज्यांची नावे मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली गेली, त्यातील
१६ नावे मुख्यमंत्र्यांनी थेट नाकारली. कारण हे १६ जण आधीच्या  सरकारात मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून दलाली, फिक्सिंग करीत होते. हे सर्व ‘फिक्सर’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले. ‘फिक्सर’ नेमू देणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
 हे असे ‘फिक्सर’ मंत्र्यांना हवेतच कशाला? “नीट काम करा. उगाच मस्ती करू नका. नाहीतर घरी जाल” असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची कबुली मंत्री माणिक कोकाटे यांनी उघडपणे दिली.
भ्रष्टाचाराचे कोठे व कोठ्यांचे दलालच नष्ट करण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *