नाना पटोलेंची शिंदे, अजितदादाना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत निमंत्रण, लोक विचारताहेत भांग पिले का?

विशेष प्रतिनिधी
नागपूर : धुळवडीच्या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांना सत्तेचे स्वप्न पडले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा यंदाही अपूर्ण राहिली आहे. या दोघांनी आमच्याकडे यावे. दोघांना आलटून-पालटून मुख्यमंत्री करू, अशी ऑफर त्यांनी दिली आहे. ( Nana Patole invites Shinde, Ajit Pawar to CM post)
धुळवडीच्या दिवशी नाना पटोले यांनी ही ऑफर दिल्याने लोकांकडून त्यांची खिल्ली उडविली जात आहे. नानांना धुळवडीच्या दिवशी पडलेल्या या स्वप्नामागे भांगेची मात्र तर काम करत नाही ना असेही विचारले जात आहे.
 पटोले म्हणाले, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्या सोबत युती केली, त्यांना संपवण्याचे काम भाजपने केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत.
आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलावणार आहोत. त्यांना पाठिंबा देऊ. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. भाजपच्या अधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *