विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. आलटून पालटून मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर बोलताना वाचाच गेली, रुसवे फुगवे आहेत पण नानांनी भांडी लवकर वाजवले अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. (Offer of Chief Minister’s post! Sanjay Raut targets Nana Patole)
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, मी काय बोलू शकतो. वाचा गेलीनाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसते. मविआ सरकार येईल असे कोणाला वाटले होते का? राजकारणात सर्व शक्यता आहे. त्यांनी कुणाला ऑफर दिली आहे व कुणी मान्य केली आहे का हे त्यांच्याशी चर्चा करून बघू. राजकारणात रुसवे फुगवे आदळ आपट सुरू आहे. नानांनी लवकर भांडे वाजवले, थोडे थांबायला हवे होते
राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंचा भगव्याशी काही संबंध नाही. भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. भगव्या झेंड्याशी त्यांचा काही संबंध नाही. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे
एकनाथ शिंदे यांच्याबाबत गौप्यस्फोट करताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे तेव्हा कॉंग्रेसकडे चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत. पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती त्यांची. हे सर्वात जास्त मला माहित आहे.
जयंत पाटील यांच्या नाराजीच्या बातम्या बाबत राऊत म्हणाले, जयंत पाटील मविआचे नेते आहेत. पवारांचे विश्वासु आहेत. काहीही अफवा पसरवू नका. अन्यथा कायद्याने कारवाई होईल
