ठाकरे बंधू एकत्र येणार … “बेगानी शादीमें” नाचायला लागलेत काँग्रेस, पवार गटाचे दिवाने!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने केलेल्या कथित हिंदी सक्तीच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्याने जणू राज्यात सत्ताबदल होणार आहे असे वातावरण ठाकरे गटात निर्माण झाले आहे. एव्हडेच नव्हे तर मनसे – ठाकरे गट या बेगानी शादीमें काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही अब्दुल्ला बनून नाचू लागले आहेत.
( Thackeray brothers will come togetherCongressPawar factions fans start dancing toBegani Shaadi

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे स्वागत करताना म्हटले आहे की , कोणी एकत्र येऊन, सर्व विसरून काही करत असतील, तर ती गोष्ट केव्हाही चांगली. दोन भावांमध्ये मतभेद असतील आणि मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे त्यांनी ठरवले तर नाराज होण्याचे काही कारण नाही

शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणले, मराठी साठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील. मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. याच पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी संजय राऊत यांच्या एकत्रित मोर्चा काढण्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की हे ट्विट बघून महाराष्ट्रद्रोहींचा प्रचंड जळफळाट झाला असेल. कुटुंब एकत्र येत असेल तर स्वागतच…!

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांनी कुठल्याही बॅनर शिवाय मराठी वाचवण्यासाठी आणि हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावाचे निमंत्रण आले तर आम्ही भूमिका मांडू, आमची भूमिका ही सकारात्मक असेल. काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, मराठी भाषेसाठी, मराठी स्वाभिमानासाठी जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील, तर त्याचं आम्ही स्वागत करतो. ही जनभावनांची लढाई आहे, पक्षभेद विसरून आपण एकत्र यायला हवं.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की मोर्चामुळे राज आणि उद्धव एकत्र येत आहेत असे काही नाही. ही चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर त्यांची ही चर्चा सुरू आहे. दोघांची संख्या वाढेल या दृष्टीने त्यांची चर्चा आहे. घरातील वाद, भांडण मिटत असतील तर ही आनंदाची बाब आहे, पण आमची महाविकास आघाडी आहे त्याचे घटक पक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कोणाबरोबर युती करावी हा त्यांचा भाग आहे.