विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर कारवाई करण्यात आली असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आले आहे. या छाप्याच्या वेळी तीन तरुणी पळून गेल्या. त्या कॉलगर्ल असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पुण्यातील खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
( Three young women escaped during raid on rave party famous bookie along with Eknath Khadses son-in-law)
रॅडीसन हॅटेलच्या मागे एका इमारतीत हा प्रकार सुरु होता. दोन तरूणी आणि पाच पुरुष या रेव्ह पार्टीत होते. छाप्यात पोलिसांना अमली पदार्थ सापडले आहेत. प्रांजल खेवलकर हा शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फ्लॅटमधून हुक्का, ड्रग्स, गांजा, दारू आदी जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली होती. प्रांजल खेवलकरसह इतर आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेले आहे. खेवलकर याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सातही जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या रेव्ह पार्टीत आणखी तीन महिला देखील होत्या, त्या छाप्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरल्या होत्या. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.
पाच पुरुष आणि दोन महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्या तरी तीन महिला पळून गेल्या आहेत. या तीन महिला कोण, कशासाठी तिथे आल्या होत्या, रेव्ह पार्टीमध्ये पाच पुरुषांसोबत पाच महिला असे गणित जुळून येत आहे. यामुळे तिथे रेव्ह पार्टीसोबत कॉल गर्लही होत्या का असाही सवाल आता उपस्थित होत आहे. आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. ज्या इमारतीतील फ्लॅटवर पोलिसांनी छापा मारला ती अशा पार्टीसाठी फ्लॅट भाड्याने दिले जातात आणि त्यांचे बुकिंग हे ऑनलाईनहोते. अशाप्रकारे तीन फ्लॅट एका रात्रीसाठी भाड्याने घेण्यात आले होते. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये रोहिणी खडसेंचा पती आणि इतर आरोपी रोव्ह पार्टी करत होते. तर त्या उरलेल्या दोन फ्लॅटमध्ये पळून गेलेल्या तीन तरुणी होत्या, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
