विशेष प्रतिनिधी
पिंपरी:पिंपरी चिंचवड – हिंजवडी मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी रस्त्यावर उतरत पाहणी केली. ( Pimpri Chinchwad Police Commissioner Vinay Kumar Chobe will take to the streets to resolve traffic congestion in Hinjewadi.)
या पाहणीनंतर आयुक्तांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे स्पष्ट केले. सकाळच्या सत्रात पिंपरी चिंचवड मधील आयटी कर्मचारी वाकड ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात हिंजवडीकडे जात असतात.तीच गोष्ट लक्षात घेत सकाळच्या सत्रात वाकड ब्रिजवर हिंजवडी कडे जाणारी वाहतूक तीन लेन तर हिंजवडी कडून वाकडकडे जाणारी वाहतूक एक लेन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी हिंजवडी कडून वाकडकडे येणारी वाहतूक तीन लेन करण्यात आली असून वाकड कडून हिंजवडी कडे जाणारी वाहतूक एक लेन करण्यात आली आहे. इतरही अनेक उपाययोजना हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी करण्यात येत आहेत
