डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील कोथरूड येथे १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जयेश कृष्णा वाघ (वय ३६) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातून अटक केली. हा आरोपी कुख्यात निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ( Police handcuff a gangster from the Ghayval gang who was hiding in a tribal camp)
वाघ कल्याण परिसरात लपला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण गाठले. टिटवाळा येथील एका आदिवासी पाड्यात वाघ गेल्या दीड महिन्यांपासून दडून बसला होता. पथकाने सापळा रचत त्याला रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपी निलेश घायवळ याच्यासह टोळीतील एकूण १२ सदस्यांवर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
