राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. दोघांनीही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कालपासूनच अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लागले आहेत. अनेक ठिकाणी मोठे बॅनर्स लागले आहेत.
नागपूर मध्ये देखील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देणाऱ्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे. या बॅनरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर “राजकारणातील ‘दादा’ अजीत दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा मजकूर छापण्यात आला आहे. या होर्डिंग्जची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.या होर्डिंग्जच्या माध्यमातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. “ही दोस्ती तुटायची नाय” “राजकारणातील ‘दादा’ अजीत दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा मजूकर या बॅनरवर छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधी सोहळ्याचा एक फोटो देखील ‘या’ बॅनरवर छापण्यात आला आहे.
नागपुरच्या सेंट्रल एवेन्यूवर हा बॅनर पाहायला मिळत आहे. बॅनरवरील ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे वाक्य साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत शरद पवारांचा फोटो आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीत दोघांच्या फोटोच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे.
