अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विजर्भात विजांसह पाऊस हजेरी लावेल. तर, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची संततधार दिसून येईल. तर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये पावसानं राज्यात उघडीप दिली आणि अचानकच तापमानाच लक्षणीय वाढ झाली. उन्हाळ्यात सूर्याचा दाह जाणवतो तितक्या उष्णतेमुळं नागरिक होरपळून निघाले. तर, वातारणातील या बदलामुळं अनेकांची प्रकृतीसुद्धा डगमगली. साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली. दरम्यान, येत्या काही दिवसांत पाऊस परतणार असून, त्यापूर्वी पुढल्या 24 तासांसाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि सातारा या भागांमध्ये यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये ताशी 40 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मुंबईसह पुण्यामध्ये देखील पावसाचं पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवाकत झाली आणि आज पावसाने जोर धारला. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याऱ्यांना त्यामुळे अडचणी देखील निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात पावसाने दडी मारली होती. पुणे शहरातील सर्व भागामध्ये पाऊस होत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आण विदर्भातह पावसाटा यलो अलर्ट देण्यात आा आहे. त्याचबरोबर कोकणातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. अनेक दिवसाने परतलेल्या पावसाने उकाडा काहीसा कमी झाला आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
