मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठींबा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट करत दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठींबा आहे.काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो असंही छगन भुजबळ म्हणाले

