राठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून आरक्षणाबाबत सर्व पक्षीय प्रमुखांची बैठक आज मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी मराठा बांधवानी कायदा व सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न निर्माण करु नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे.
जरांगे पाटील यांनी सुरु केले उपोषण स्थगित करावे. त्याचबरोबर आपल्या तब्यतेची काळजी घ्यावी, असे सांगून मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. मराठा आरक्षणबाबत आत्तापर्यंत शासनाकडून 26 बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजातील बांधवानींही शांतता पाळून सहकार्य करावे. असे आवानही यांनी केले.
शंभुराज देसाई म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवणं हा एकमेव पर्याय दिसतो आहे. या सर्व गोष्टींवर महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव व भगिनींनी थोडंसं गांभीर्यपूर्वक बघितलं पाहिजे. काही ठिकाणी आमदारांची घरं जाळली. आमचे विधीमंडळातील एक सहकारी आमदार त्यांच्या पत्नी माध्यमांसमोर सांगत होत्या की, त्यांची मुलं भेदरलेल्या अवस्थेत कशी घरात बसली होती.”
“आम्ही आमदारही जनतेचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही सर्वधर्मीय, सर्वजातीय ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी आहोत. आरक्षण द्यायचं नाही असं आमच्यापैकी एकही आमदार कधी म्हटला आहे का? सर्व आमदारांचं म्हणणं आहे की, कायद्याच्या चौकटीत बसणारं, नियमात टिकणारं आणि तहहयात शिक्कामोर्तब होईल असं आरक्षण द्यायचं आहे. त्याच मताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत,” असं मत शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलं.
