आज महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायासंबंधी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर आज करण्यात आला आहे. , राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भेट देत, महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रात आता ₹2000 कोटींची गुंतवणूक येणार, 5000 रोजगारांची निर्मिती होणार. आम्ही येणाऱ्या दोन वर्षात महाराष्ट्राला उद्योगात नंबर 1 राज्य बनविणार असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

“आमचं सरकार येऊन तीन महिने होत असताना, एक ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्यात येत आहेत, कि महाराष्ट्रातून उद्योग धंधे बाहेर जात आहेत. मात्र हे सपशेल खोटे आहे. काही राजकीय पक्ष आणि एचएमव्ही पत्रकार (हिज मास्टर्स व्हॉइस पत्रकार) यांनी मिळून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा घाट घातला आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रा केवळ भ्रष्टाचार, वसूली, गृहमंत्री जेल मध्ये, पोलिस आयुक्त जेलमध्ये अशी परिस्थिती होती. असे असाताना कुठलेच उद्योग महाराष्ट्रात येण्यास तयार नव्हते, महाराष्ट्रात गुंतवणूक तयार करायला तयार नव्हते. ही महाराष्ट्रातील विस्कटलेली घडी आम्ही जागेवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.” असे म्हणत फडणवीस यांनी विरोधी पक्ष आणि गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
तुम्हाला महाराष्ट्रात आता होणाऱ्या गुंतवणूकीवर सवाल उपस्थिती करण्याचा काय अधिकार ?
यावेळी फडणवीस विरोधीरपक्षावर निशाणा साधत म्हणाले. गुंतवणूकीचा बाप अर्थात महाराष्ट्रात आता पर्यंतची होऊ घातलेली सर्वात मोठी गुंतवणूक अर्थात रिफायनरी, ज्यांनी नाकारली आलेली गुंतवणूक ज्यांनी परत पाठवली त्यांना काय अधिकार आहे महाराष्ट्रात आता येणाऱ्या गुंतवणूकीवर आणि आमच्या प्रयत्नांवर सवाल उपस्थित करण्याचा ? आजवर देशात इतकी मोठी गुंतवणूक कधीच झाली नव्हती तेवढी मोठी गुंतवणूक, तीन लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, एक लाख कोटी हून जास्त लोकांना रोजगार, अशी रिफायनरी, ज्या लोकांच्या विरोधामुळे होऊ शकली नाही, आज ते प्रश्न उपस्थित करत आहेत ? यांना हा अधिकार कुणी दिला ? असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
टाटा एअरबस प्रकल्प 2021 मध्ये गुजरातमध्ये नियोजित झाला, पण खापर आमच्यावर फोडले जात आहे. विरोधी पक्षनेता असताना मी स्वतः टाटांशी संबंधित व्यक्तींना माझ्या घरी बोलाविले. पण त्यांनी त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण उचित नाही, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. असे म्हणत फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचाराला टोला लगावला.
यावेळी फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांबद्दल आणि येऊ घातलेल्या गुंतवणूकीबद्दल माहिती दिली.
