२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

वर्ल्ड लिडर म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतात कशी आहे ? यावर नेहमीच चर्चा होत असते. आता लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक याबाबत परस्पर विरोधी दावे करतांना दिसत आहेत. याबाबत अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या इप्सोस इंडियाबस या संस्थेने एक अहवाल प्रसिध्द केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रूवल रेटिंमध्ये (मान्यता प्राप्त नेता ) वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ७५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळवली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. त्यात आता १० टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ निवडणुका जवळ आल्या असताना लोकांचा कल मोदींच्याच बाजूने असल्याचं चित्र आहे.

२०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ६० टक्के अप्रूवल रेटिंग होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना ६७ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. म्हणजेच पंतप्रधान मोदी यांना दिवसेंदिवस मान्यता वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्या अप्रूवल रेटिंगमध्ये २ टक्क्यांनी घट झाली होती. पण, त्यांनी पुन्हा एकदा मोठी मजल मारली आहे. २०२४ मध्ये त्यांनी अप्रूवल रेटिंग वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अनेक महत्त्वाच्या घटना देशात घडल्या आहेत. कोरोना काळात व त्यानंतर भारताचा जागतिक पातळीवर दबदबा वाढला आहे. कश्मीर मधून कलम ३७० हटविणे, अयोध्येत राममंदीराचे निर्माण, मेक इन इंडियाचा वाजणारा डंका, जी २० परिषदेचे यश अशा काही गोष्टी मोदींच्या पथ्यावर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांची अप्रूवल रेटिंग वाढली आहे. राम मंदिराच्या निर्माणामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात मोदींची लोकप्रियता वाढली आहे.

वयोगटानुसार देण्यात आलेले रेटिंग

४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्ती- ७९ टक्के
१८ ते ३० वयोगटातील व्यक्ती -७५ टक्के
३१ ते ४५ वयोगटातील व्यक्ती -७१ टक्के
महिला- ७५ टक्के
पुरुष- ७४ टक्के

भागानुसार देण्यात आलेले रेटिंग

उत्तर भारत- ९२ टक्के
पूर्व भारत- ८४ टक्के
पश्चिमी भारत-८० टक्के
दक्षिण भारत -३५ टक्के