पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४,७७७ घरांसाठी सोडत जाहीर

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर काल म्हाडाने दिली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) या काल घरांची सोडती जाहीर केल्या आहेत. म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील या वेळी उपस्थित होते.

पुण्यात घर घेण्याचे सर्व सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४७५ आणि ५६१ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४ हजार ७७७ घरांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी शुक्रवार पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

या अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे. म्हाडाचा या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी अर्जदारांना https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे. या सोडतीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी देखील उपलब्ध असून या साठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

या सोडतीतील योजनेनुसार घरांचा तपशील

१- म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – एकूण २४१६ सदनिका

२- म्हाडाच्या विविध योजने अंतर्गत एकूण १८ सदनिका

३- म्हाडा पंतप्रधान आवास योजना एकूण ५९ सदनिका

४- पंतप्रधान आवास( पीएमएवाय) खाजगी भागीदारी योजना– एकूण ९७८ सदनिका

५- २०% योजना पुणे महापालिका एकूण ७४५ सदनिका आणि पिंपरी चिंचवड एकूण ५६१ सदनिका

असे मिळून ४७७७ सदनिकांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे.