रामटेकची जागा शिवसेनेकडे तर अमरावतीत भाजपचाच उमेदवार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेला जाणार आहे. तर अमरावती मतदारसंघ भाजपकडे असेल. अमरावतीत महायुतीचे सर्व भाजप उमेदवाराला पाठिंबा देतील. आम्ही सर्वांशी चर्चा करु. सर्व जागांवर चर्चा सुरू आहे. काही जागा भाजपला देखील सोडाव्या लागणार आहेत. बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे. अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत. काही ठिकाणी राष्ट्रवादी तर काही ठिकाणी शिवसेना जिंकू शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी केले स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये देखील जागावाटपाचा प्रश्न मिटला नाही. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. महायुतीत कोणताही तिढा नाही, ५ मिनिटात चर्चेतून प्रश्न सुटतील अशी परिस्थिती असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

अमरावतीची जागा भाजपकडे आहे. शंभर टक्के ही जागा भाजपच्या चिन्हावर लढू आणि महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन ही जागा आम्ही जिंकणार आहे. उदयन राजे यांची सातारा ची मागणी आहे,त्यावर महायुतीचे नेते निर्णय घेतील. अमरावती मतदार संघात काही मतभेद होत असतात,बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील मात्र देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी बच्चू कडू,अडसूळ सगळे प्रयत्न करतील.

“जागावाटपाबाबत 2 ते 3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. महायुती म्हणून आम्ही 13 पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. बूथवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. 51 टक्के मतं मिळतील अशी आम्हाला आशा आहे. नरेंद्र मोदींनी सुरु केल्या योजना आणि महाराष्ट्राला केलेली मदत यामुळे आम्हाला मतं मिळतील. काँग्रेसची 65 आणि मोदींची 10 वर्षं यांची तुलना केल्यास मोदींची 10 वर्षं वरचढ ठरतात. जनतेलाही विकसित भारतासाठी मोदींना साथ दिली पाहिजे हे आता समजलं आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के वाढतील असं दिसत असल्याचंही त्यांनी सांगित