कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देणे सुरू आहे. गुरुवारी रात्री कल्याण जिल्हा महिला संघटकासह सुमारे शंभर पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील कोपरी पूर्व येथे चैत्र नवरात्रौत्सव मंडपात जाहीर प्रवेश केला. यात कल्याण पूर्व आणि पश्चिम मधील कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले.

शिवसेनेत आजही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने काम सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका याला यांनी तिलांजली दिली, आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले, त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.याचदरम्यान बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका याला ज्यांनी तिलांजली दिली, आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले, त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी केले.

राज्याला आता फेसबुकवर नव्हे तर लोकांमध्ये मिसळून काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत. ती तळमळ कल्याणमधील महिला कार्यकर्त्यांमध्ये दिसते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजया पोटे यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांचा गौरव केला. खासदारश्रीकांत शिंदे यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. यावेळी ते नक्कीच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आपण केलेली विकास कामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा आणि शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

विजया पोटे या मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून महिला आघाडीत त्यांचे संघटन चांगले आहे. त्यांच्यासोबत उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर, नमिता साहू, भारती भोसले, मंदाकिनी गरुड, मोनिका इंगळे, रंजना पाटील, वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक, उपशाखा संघटक, युवासेना पदाधिकारी असे सुमारे १०० पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.