काही महिन्यांपूर्वी मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. त्यातच मिलिंद देवरा यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. काँग्रेस काय आहे हे मला चांगलंच माहित आहे. काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, असे विधान शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केले आहे. तसेच कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभा राहील,संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात, असे देखील मिलिंद देवरा यांनी सांगितले आहे.
देवरा यांनी सांगितले की, वर्षा गायकवाड ही माझी बहिण आहे. माझे वडील आणि वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचे जुने संबंध होते. काँग्रेसने दलितांमधील केवळ एक उमेदवार दिला त्यामुळे काँग्रेसची भूमिका दलित विरोधी आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे. पूर्ण राज्यात काँग्रेसवर खूप नाराजी आहे. महाविकास आघाडी संधी साधू आघाडी असल्याचे देवरा म्हणाले. महाविकास आघाडी ही संधी साधू आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नका म्हणून मी काँग्रेसला त्यावेळी वारंवार सांगत होतो. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दिल्लीतील कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना कधी अभिवादन केलं नाही, असा खोचक टोला खासदार देवेरा यांनी काँग्रेसला लगावला.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नका म्हणून मी काँग्रेसला त्यावेळी वारंवार सांगत होतो. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दिल्लीतील कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना कधी अभिवादन केलं नाही. महाविकास आघाडीतील पक्ष खोक्यासाठी, खुर्चीसाठी एकत्र आले.
