उल्हासनगरमधील कोणार्क अर्बन बँकेवर आरबीआयचे निर्बंध; पैसेही काढता येणार नाहीत

रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांविरोधात कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. आरबीआयने आयडीएफसी फस्ट बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्स तसेच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र यावर आरबीआयने कारवाई केली होती. त्यानंतर आरबीआयने आता आणखी एका बँकेवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. या बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्याची स्थिती पाहता या बँकेतून कोणतेही व्यवहार ग्राहकांना करता येणार नाहीत. शिवाय कोणत्याही परिस्थितीत या बँकेतून तूर्तास तरी पैसे काढता येणार नाहीत असे आदेश देण्यात आले आहेत. ग्राहकांना लोन काढता येऊ शकतं.आरबीआयने म्हटले आहे की कर्जदारांवर बंदी म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवेल असे त्यात म्हटले आहे.

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेता, सर्व बचत खाती किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.आरबीआयने म्हटले आहे की बँकेवर हे निर्बंध म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवेल असे त्यात म्हटले आहे.

केंद्रीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत असते आणि त्या आधारावर कारवाई करते. अनेक वेळा बँकांवर कडक निर्बंध लादले जातात तर कधी परवानेही रद्द केले जातात. यामध्येही आरबीआयने सर्वाधिक कारवाई सहकारी बँकांवर केली आहे.