पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दिवाळीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
