भर रस्त्यात बिभत्स शरीरप्रदर्शनाच महिला आयाेगाकडून समर्थन का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकर यांना सवाल

मुंबई : उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडं-नागडं फिरणं या वृत्तीला विरोध आहे. भर रस्त्यात बिभत्स शरीर प्रदर्शनाच समर्थन महिला आयाेग करतोय का? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना केला आहे.


 कोणी थोबाड रंगवण्याची भाषा करत असेल तर उर्फीला धोका आहे, त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी आली तर याबाबतीत आम्ही दखल घेऊ शकतो. याबाबत आम्ही महाराष्ट्र पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सुरक्षेची मागणी करु शकतो”, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली.


यावर चित्रा वाघ यांनी  ट्विट करून म्हटले आहे की,  सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?
भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगाने स्वतः याची दखल घेत जाब का विचारला नाही. कायदा कायद्याचं काम करणारंच. महिला आयोग काही करणार की नाही ? सामाजिक भान आणि स्वैराचाराला विरोध असा हॅशटॅग करून त्यांनी हा सवाल विचारला आहे.