राजकारणात एकमेकांवर टीका काही नवीन नाही. पण ती टीका वैयक्तिक जीवनावर किंवा शरीर यष्टीवर केली जात नव्हती परंतु अलीकडे विरोधकांवर टीका करताना राजकारणी आपली पातळी सोडताना दिसत आहेत. अशातच संजय राऊत व नारायण राणे यांच्यात यावरून वाद होताना दिसत आहे. नारायण राणे हे आधी शिवसेनेत होते, त्यानंतर ते काँग्रेस मध्ये गेले आणि आता भाजपमध्ये आहेत. ते केंद्रात मंत्री देखील आहेत. त्यांच्या याच मंत्री पदावरून, त्यांच्या शब्द उच्चारावरून व उंचीवरून महाविकास आघाडीमधील नेते त्यांच्यावर व त्यांच्या मुलांवर पातळी सोडून टीका करताना दिसतात.
नारायण राणे हे तोडीस तोड उत्तर देतात म्हणून त्यांच्या टीका करताना राजकारणी आपली पातळी सोडतात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्या पैकी एक संजय राऊत यांनी राणे यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. अत्यंत खालच्या पातळीत त्यांनी टीका केली. तोडीस तोड उत्तर देणारा नेता ह्यांना सापडला कि हे लोक त्याच्यावर चिडतात नाही ती टीका करतात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. नारायण राणेंच्या बाबतीत असंच झालंय नारायण राण, नितेश राणे, निलेश राणे यांची शाररिक उंची ही निसर्गाची देणं आहे. त्यावर बोलण्याचा कुणालाही काही अधिकार नाही. तरी विरोधी पक्षनेते अजित पवार हे नितेश राणेंना टील्या आमदार असे बोलले, आता एखाद्या आमदाराला असं बोलणं म्हणजे त्यांचीच बुद्धी टिल्ली म्हणजे खुजी आहे हे तुम्ही तुमच्या बोलण्यातून दाखवताय.
नेत्याची असो किंवा सामान्य माणसाची बोलण्याची एक पद्धत आहे. त्यात त्यांचे काही दोष असतील किंवा काहींची ती सवय असलं पण त्यांच्या त्या गोष्टीवर वारंवार बोलून त्या माणसाचा संयम तोडण्यास काही लोक भाग पडतात. नारायण राणेंवर टीका करताना पातळी सोडली ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील नारायण राणे यांच्या वर टिक करताना सोडली. नारायण राणीने हे अशा नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात. शरीरयष्टी वरून काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर देखील टीका केली. परंतु, देवेन्द्र फडणवीस हे नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून उत्तर देतात. अशाच प्रकारची टीका किरीट सोमय्या यांच्यावर देखील करण्यात येते ह्या अशा लोकांची मानसिकताच मुळात टिल्ली असते.
