लक्षद्वीप : माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी लक्षद्वीपचे राष्ट्रवादी कांग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. राजकीय कारणावरून खासदार मोहम्मद फैजल आणि इतर तीन आरोपींनी माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राजकीय विषयांवरुन हा हल्ला घडला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या सालेह यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला तर त्यांना आपली खासदारकी गमवावी लागू शकते. काँग्रेसचे पी. एम. सईद लक्षद्वीपमधून सतत दहा वेळा निवडून आले हाेते. 2014 साली पी.एम.सईद यांचे पुत्र मुहम्मद सईद यांना राष्ट्रवादी तिकिटावर लढून मोहम्मद फैजल यांनी पराभूत केले हाेते. 2019 मध्येही त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.
