नेपाळमध्ये विमान कोसळलं; विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत

खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि नदीत कोसळले. यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ कोसळलेले प्रवासी विमान यती एअरलाईन्सचे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते.

एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता.