मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दावोस मध्ये जाऊन आले आणि त्या ठिकाणावरून वर्ल्ड इकॉनोमी फोरमच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमधून उद्योग महाराष्ट्रात कसे आणता येतील, रोजगार कसे निर्माण करता येतील या दृष्टीने या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस ला गेले होते. तिथून आल्यानंतर त्यांनी जाहीर केले की जवळपास १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार विविध कंपन्यांशी करण्यात आला त्यामुळे किती प्रमाणात रोजगार महाराष्ट्रात येईल ही सर्व माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आणि त्यातून सगळ्यांच्या लक्षात आलं की या भेटीच्या माध्यमातून कशाप्रकारे महाराष्ट्राला फायदा होणार आहे.
परंतु मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली ही प्रतिक्रिया एकंदरीतच या दौऱ्याची थट्टा उडवणारी होती. संजय राऊत म्हणाले की, दावोस मध्ये काय होतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. अशा प्रकारचे रोजगार मेळावे अनेक ठिकाणी होत असतात त्यामुळे त्यात नाविन्य असं काही नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जे काही तिकडे प्रस्ताव केलेले आहेत सामंजस्य करार केलेले आहेत. त्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतील, उद्योग येतील तेव्हा बघू असं राऊत म्हणाले. आता संजय राऊत यांनी असं वक्तव्य करणे हे काही नवीन नाही किंवा त्यांचा विधान घेणे गरजेचे देखील नाही पण त्यांच्याच प्रमाणे ठाकरे गटातील व महाविकास आघाडी मधील नेतेही गेल्या काही दिवसांपासून वारंवार उद्योगांच्या संदर्भात वक्तव्य करीत आहेत. पत्रकार परिषद देखील घेत आहेत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील रोजगार उद्योग हे बाहेर नेण्यात आले राज्यातील तरुण बेरोजगार राहिले अशा प्रकारचे विधान सातत्याने आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई किंवा महाविकास आघाडीतील अनेक नेते करताना दिसत आहेत.
जेव्हा हे आरोप होतात तेव्हा हाच प्रश्न पडतो की नेमकं महाविकास आघाडीच्या काळात किती उद्योग महाराष्ट्रात आले होते? आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही सुद्धा दावोस ला गेलो होतो त्यावेळेस आम्ही 80 हजार कोटींचे प्रस्ताव किंवा जसे सामंजस्य करार केले. जर असं असेल तर मग त्याची माहिती मात्र कधी समोर आली नाही. कोणत्या कंपनीची करार केली किती रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या? त्या कंपन्या कुठे उभारण्यात येणार होत्या? करार कसा झाला? हे मात्र आदित्य ठाकरे यांनी कधीही सांगितलं नाही. एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यानंतर आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या करांची सविस्तर माहिती दिली तशी माहिती आदित्य ठाकरे किंवा सुभाष देसाई यांनी दिलेली कुणालाही आठवत नाही दावोस वरून तुम्ही उद्योग आणले असतील तर ते उद्योग कुठे आहेत. हा प्रश्न त्यांना कधी कोणी विचारलं नाही किंवा त्यांनाही त्या उत्तर द्यावं वाटलं नाही. महाविकास आघाडीच्या काळात नेमकं कोणते उद्योग व्यवसाय महाराष्ट्रात आले आणि त्यामुळे किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला यावर संजय राऊत कधी बोलताना दिसत नाहीत महाविकास आघाडीने कोणते उद्योग महाराष्ट्रात आणले.
